आंब्याचे रायते Mango Salad
साहित्य :
दोन वाट्या गोड दही, अर्धी वाटी नारळाचा चव, एक छोटा तुकडा आलं, तोतापुरी किंवा घट्टसर आंब्याच्या बारीक फोडी, थोडी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे पूड, एक चमचा साखर, फोडणीसाठी मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता
कृती :
दही घुसळून घ्यावे.
त्यात आलं आणि नारळाचं चव वाटून मिसळावे.
आता त्यात आंब्याच्या फोडी, मीठ आणि साखर घालावी. त्यात वरून फोडणी करून घालावी.
चिरलेली कोथिंबीर वरून टाकून छान सजवून हे रायते सर्व्ह करावे.
mango, raayta, marathi recipes, mango raayte, summer