कर्नाटकी चटणी 

कर्नाटकी चटणी Coconut Chatani

साहित्य : 

अर्धी वाटी खवलेला नारळ, पाव वाटी कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, आल्याचा लहान तुकडा, १ छोटा कांदा, अर्धा चमचा मेथी दाणे, १ चमचा लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ, साखर, मीठ, तेल , एक चमचा उडीद डाळ 

कृती : 

कांदा बारीक चिरून घ्यावा. तेलात मोहरी, हिंग घालून उडीद डाळ परतून घ्यावी. त्यात मेथी दाणे घालावे आणि गुलाबीसर परतून घ्यावे. 

त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा , नारळाचा चव, आले आणि मिरच्या घालून परतून घ्यावे. 

किंचित गार झाल्यावर ह्या मिश्रणात मीठ, साखर, चिंच किंवा लिंबू रस घालून वाटून घ्यावे.  

हि चटणी गरम इडली किंवा डोस्यासोबत खूप छान लागते. 

chatni recipe in marathi, indian chatani, coconut chatani, south indian style chatani