काजू पिस्ता रोल 

काजू पिस्ता रोल 

साहित्य : 
१ वाटी काजू पेस्ट, १ वाटी पिस्ते पेस्ट, अर्धी वाटी साखर, पाव वाटी पाणी, वेलचीपूड, खाण्याचा हिरवा रंग किंवा पिस्ता फ्लेवरचे इमल्शन 

कृती : 


कढईमधे साखर आणि पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी. मग वेलची पूड घालून मिक्स करावी. 

एकतारी पाक झाला कि लगेच खाली उतरवून घ्यावे आणि त्याचे दोन भाग करावे. 

एका भागात काजू पेस्ट आणि एका भागात पिस्ता पेस्ट घालावी. आणि खाण्याचा हिरवा रंग किंवा थोडे पिस्ता फ्लेवरचे इमल्शन घालाव

पिस्त्याचे मिश्रण मिक्स करून त्याचा लांब रोल करावा आणि काजूचे मिश्रण मिक्स करून त्याची जाडसर पोळी करावी. 

आता काजूच्या पोळीत पिस्त्याचा रोल घालून त्याचा रोल करावा. रोल तसाच तासभर सेट होण्यासाठी ठेवावा. 

आणि तासाभरानंतर आवडीनुसार त्याचे तुकडे कापावे. हवे असल्यास वरून थोडा चांदीचा वर्ख लावून सजवावे. 

याची चव अगदी बाजारातून आणलेल्या मिठाईसारखी असते. शिवाय घरीच केली असल्यामुळे भेसळ वगैरे शंका न राहता आपण मनसोक्त एन्जॉय करू शकतो. 

Scroll to Top