वऱ्याच्या तांदळाचा भात (उपवास रेसिपी)
साहित्य :
दोन वाट्या वऱ्याचे तांदूळ, चार वाट्या पाणी, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तूप
कृती :
पद्धत १ –
वऱ्याचे तांदूळ दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. पातेल्यात चमचाभर तूप घालून वऱ्याचे तांदूळ परतून घ्यावे.
नंतर त्यात चार वाट्या पाणी गरम करून घालावे.
झाकण ठेवून मध्यम गॅसवर शिजवावे.
तांदूळ चांगले शिजल्यावर गॅस बंद करून वाफेवर पाच मिनिट तांदूळ उमलू द्यावे.
पद्धत २ –
चार वाट्या पाणी पातेल्यात तापत ठेवावे. आधण आल्यावर त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ, तूप आणि मीठ घालावे. चमच्याने चांगले ढवळून घ्यावे.
मंद गॅसवर शिजू द्यावे.
वऱ्याच्या तांदुळाचा भात मोकळा हवा असेल तर पाणी थोडे कमी घालावे.
खास टिप्स:
हा भात खायला देतांना सोबत दाण्याची आमटी, लिंबाचे लोणचे किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत द्यावा.
तांदुळावर तूप घ्यावे म्हणजे पचायला हलके होतात.
वरई बारीक दाण्यांची असेल तर पाणी कमी लागते.
upwas recipes, upvas recipes, fasting recipes, in marathi, boli marathi, marathi recipes, shravan somvar recipes, उपवास रेसिपी, वऱ्याच्या तांदळाचा भात,दाण्याची आमटी