रताळ्याच्या काचऱ्या
साहित्य :
पाव किलो रताळी, अर्धी वाटी साखर आणि चार चमचे तूप
कृती :
रताळी स्वच्छ धुवून त्याची साले काढून घ्यावी. त्याच्या गोल पातळ काचऱ्या कराव्या.
कढईत तूप तापत ठेवून त्यात काचऱ्या परतून घ्याव्या. थोडासा पाण्याचा शिपका मारावा आणि एक वाफ येऊ द्यावी.
त्यात आता साखर आणि किंचित मीठ घालावे. साखर कोरडी झाल्यावर गॅस बंद करावा.
रताळ्याच्या काचऱ्या, boli marathi, upwas recipes, upvas recipes in marathi, marathi recipes, shravan recipes, sweet potato recipes, sweet potato fries,