कटाची आमटी 

कटाची आमटी 

साहित्य : 

सहा वाट्या घट्ट कट, १ वाटी सुके खोबरे, १ वाटी कांदा, ३ चमचे कांदा लसूण मसाला, २ चमचे चिंचेचा कोळ, २ चमचे तिखट, ६ आमसूल, मिरी, वेलदोडे, लवंगा, धने, जिरे, दालचिनी, आले लसूण, 

२ चमचे हिंग, कढीपत्ता, आणि चवीनुसार मीठ 

कृती : 

कट म्हणजे हरबरा डाळ शिजून त्यातून बाजूला काढलेले पाणी आणि पुरणयंत्रातून पुरण काढल्यावर बाजूला चिकटलेले पुरण याचे मिश्रण. 

धने,जिरे, दालचिनी, आले लसूण, लवंगा, वेलदोडे, मिरी, सुके खोबरे आणि कांदा एकत्र बारीक वाटून घ्या. 

एका पातेल्यात जिरे आणि हिंग यांची फोडणी करा, त्यात आमसूल, कढीपत्ता परतून घ्या. 

यात वाटण आणि कांदा लसूण मसाला घालावा आणि हे मिश्रण तेल सुटेस्तोवर चांगले परतून घ्या. 

त्यानंतर त्यात कट आणि वाटीभर गरम पाणी घालावे. चांगले खळखळ उकळत असताना मीठ आणि चिंचेचा कोळ घालावा. 

अजून एक उकळी आणून गॅस बंद करावा. 

हि कटाची आमटी पुरण पोळीसोबत अतिशय खमंग लागते. 

Scroll to Top