गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया!
गणपती बाप्पाच्या आगमनाचे जसे आपल्याला वेध लागतात तस तशी गणेशाची भक्तिपूर्ण गाणी सुद्धा आपल्या कानात रुंजी घालू लागतात.
हे असेच एक भावपूर्ण भक्तीगीत, लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरात आपण हे नेहमीच ऐकलेले. यातल्या ओळी गणेशाचे अगदी सुंदर वर्णन करतात.
गजानना श्री गणराया,आधी वंदू तुज मोरया!
गजानना, श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया,
आधी वंदू तुज मोरया
सिंदुरचर्चित धवळे अंग,
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग,
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया
गौरीतनया भालचंद्रा,
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा,
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया
gajanana shri ganraya lyrics in marathi, lyrics in marathi, ganpati gaani, गजानना श्री गणराया, गणपती गाणी, गणपती गाणी मराठी, ganpati aarti, lata mangeshkar, ganpati songs famous