तिखट मिठाचे दाणे 

तिखट मिठाचे दाणे 

मधल्या वेळचे खाणे काय करायचे? नेहमी तोच तोच पदार्थ नको, शिवाय चवीचा हवा, पोषणाचा हवा आणि फार वेळखाऊ पण नको. 

अश्या वेळेस काय करावे हाच मोठा प्रश्न असतो ना, पण आज याच प्रश्नाचे एक झटपट तयार होणारे उत्तर आम्ही तुमच्यासाठी आणले आहे. 

एकदा हे तिखट मिठाचे दाणे करून बघा. बनवायला सोपे शिवाय पौष्टिक मग आणखी काय हवे? 

साहित्य : 

दोन वाट्या भाजलेले दाणे, अर्धा चमचा तूप, तिखट, अर्धा चमचा मीठ, जिरेपूड, मिरेपूड 

कृती : 

तुपात जिरेपूड आणि मिरेपूड टाकून परतून घ्यावी. त्यात भाजलेले दाणे सोलून घालावे. मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. सगळ्यात शेवटी वरून थोडे तिखट टाकून थोडे परतून गॅस बंद करावा. 

खास टिप्स : 

* जिऱ्याची पूड नसल्यास फोडणीत थोडे जिरे  घातल्यास हि चालते. 

* भाजलेल्या शेंगदाण्याऐवजी तळलेले शेंगदाणे वापरल्यास आणखी खमंग लागतात. 

Scroll to Top