साबुदाण्याच्या पिठाचे लाडू
साबुदाण्याच्या पिठाचे लाडू
साहित्य :
साबुदाणा पीठ दोन वाट्या, पिठीसाखर दोन वाट्या, तूप
कृती :
साबुदाण्याचे पीठ आणि पिठीसाखर एकत्र करावी. हे मिश्रण हाताने मळले जाईल इतके म्हणजे साधारण अर्धा ते पाऊण वाटी तूप पातळ करून घालावे.
हाताने हे मिश्रण चांगले मळून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे तूप पातळ करून आणखी घालावे आणि चांगले मिक्स करावे.
आता या मिश्रणाचे चांगले लाडू वळून घ्यावे.