अळूची भाजी 

अळूची भाजी 

साहित्य : 

८ भाजीच्या अळूची पाने, १ गड्डा चुका, १ मुळा, ५ हिरव्या मिरच्या, प्रत्येकी पाव वाटी दाणे, काजूचे काप, ओले खोबरे काप, हरबरा डाळ, २ चमचे डाळीचे पीठ, १ चमचा साखरेचा घट्ट पाक, ४ चमचे गोडा मसाला, २ चमचे चिंचेचा कोळ, फोडणीचे साहित्य आणि चवीनुसार मीठ 

कृती : 

अळू आणि चुका स्वच्छ धुवून, बारीक चिरून घ्यावे. त्यातच मुळ्याच्या चकत्या घालाव्या. दाणे आणि हरबरे ३ तास भिजवावे. नंतर निथळून घ्यावे. अळू आणि मुळा शिजत ठेवावा. 

पूर्ण शिजल्यावर रवीने छान घुसळून घ्यावा. 

एका पातेल्यात अर्धी वाटी तेल तापवून खमंग फोडणी करून घ्यावी. 

या फोडणीत काजू, कढीपत्ता, दाणे,हरबरा डाळ तळून घ्यावी. चांगले तळल्यावर त्यात मिरच्या घालाव्या. 

नंतर त्यात भाजीचे मिश्रण घालावे. 

लगेच डाळीचे पीठ, गुळाचा खडा आणि मीठ घालावे आणि भाजीला एक छान उकळी आणावी. 

गरम गरम अळूची भाजी तयार! 

Scroll to Top