आमसुलाची चटणी 

आमसुलाची चटणी 

साहित्य : 

१०-१० आमसुले, एक मोठा चमचा आल्याचा तुकडा किसून, अर्धा चमचा जिरे, गुळाचा खडा, दोन हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ 

कृती : 

कोमट पाण्यात आमसुले १-२ तास भिजत घालावी. नंतर इतर सर्व पदार्थ घालून मिक्सरमध्ये आमसुलाचे चटणी वाटावी. 

वाटतांना गरज लागेल तसे आमसूल भिजत घालतेले पाणी घालावे. हि चटणी फ्रिज मध्ये ठेवल्यास दोन दिवस राहते. 

खास टिप्स : 

* साध्या मिठाऐवजी काळं मीठ घातल्यास चटणी आणखी स्वादिष्ट होते.