दाण्याची चटणी 

दाण्याची चटणी 

साहित्य : 

एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे, एक चमचा जिरे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ 

कृती: 

दाणे, जिरे, तिखट आणि मीठ एकत्र करून मिक्सरवर वाटावे. हि चटणी जरा जाडसरच वाटावी. आयत्यावेळी त्यात दही किंवा ताक घालून कालवावे. आणि वरून तुपात जिऱ्याची फोडणी द्यावी. 

खास टिप्स: 

* हि चटणी जरा पातळ केल्यास गरम इडलीसोबत हि खूप टेस्टी लागते.