बुंदीचे लाडू | Bundi Ladoo Recipe Marathi

बुंदीचे लाडू | Bundi Ladoo Recipe

बुंदीचे लाडू हे भरपूर जणांना आवडतात आणि आपल्याकडे सणावाराला चवीने खाल्ले हि जातात. 

पण हे लाडू बाजारातून घेण्यापेक्षा घरीच बनवता आले तर ? म्हणूनच आज तुमच्यासाठी खास बुंदीच्या लाडूची हि रेसिपी आम्ही घेऊन आलो आहोत. 

बुंदीचे लाडू कसे बनवाल? (how to make bundi ladoo at home easy recipe)

साहित्य :

२ आणि १/२ कप बेसन,१ आणि १/३ कप साखर, १/४ कप दूध, आवश्यकतेनुसार नारिंगी रंग,तळायला तूप,१ चमचा वेलची पूड,  सजावटीसाठी बदाम पिस्ता

कृती : 

तीन कप पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवावे व त्याचा एकतारी पाक करावा.
दूध चांगले मिक्स करावे. इच्छेनुसार नारिंगी रंग मिक्स करावा.
डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. नंतर त्यात १ टेबलचमचा कडकडीत तुपाचे मोहन घालावे व पीठ भिजवावे.
एका खोल कढईत तूप गरम करण्यास ठेवावे. नंतर कढईत तूप तापत ठेवावे व बुंदीच्या झाऱ्यावर वरील पीठ थोडे घालून झारा ठोकून बुंदी पाडाव्या.
कढईजवळ कढईच्या उंचीपेक्षा जरा उंच येईल असा झारा  धरावा. हाताने झारा ठोकावा. त्यातून बुंदी तुपात पडतील त्या तळून घ्या, नंतर बूंदी साखरेच्या पाकात टाकाव्यात.

जेव्हा बूंदी पाक पूर्ण शोषून घेतील तेव्हा त्यात वेलची पूड घालावी.
गोळे तयार करून लाडू वळावेत. बदाम आणि पिस्ता वापरून वरून सजवावे. बुंदीचे चविष्ट लाडू तयार! 

bundiche laddu recipe in marathi, bundiche laadu kase banvave, बुंदीचे लाडू, ladoo recipe, laadu recipe, indian laddu, indian sweets recipes, marathi recipes, बुंदीचे लाडू रेसिपी, बुंदीचे लाडू कसे बनवावे