खमंग चटण्यांचे प्रकार | Chatani Recipes

खमंग चटण्यांचे प्रकार

आवळ्याची चटणी – १ 

साहित्य : 

७-८ मोठे डोंगरी आवळे, ३ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मीठ, फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल, प्रत्येकी पाव चमचा हिंग, मोहरी, हळद 

कृती : 

आवळे उकडून घ्यावे. बिया काढून टाकाव्या. मिरच्याचे तुकडे करावे. 

हे सगळे एकत्र करून पाट्यावर अगर मिक्सरवर बारीक चटणी वाटावी. आणि वरून फोडणी द्यावी. 

हि चटणी नुसत्या पोळीसोबत हि खूप खमंग लागते. 

आवळ्याची चटणी – २

साहित्य : 

३-४ वाट्या आवळे, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ, थोडी कोथिंबीर, थोडी साखर 

कृती : 

आवळे स्वच्छ धुवून आवळ्याचे काप करून घ्या. आणि या फोडींसह बाकी साहित्य मिक्सर अगर पाट्यावर वाटून घ्या. 

खास टिप्स : 

आवळे कधी कधी जास्त आणले जातात आणि एकदम खाल्ले जात नाही. अश्या वेळेस त्याची अशी चटणी केली तरी जेवणात रुची हि येते आणि लहान मोठे सगळे आवडीने खातात. 

पालकाची चटणी 

साहित्य : 

१०-१२ पालकाची पाने, ७-८ पुदिन्याची पाने, एक छोटा कांदा चिरून, दोन चमचे घट्ट दही, दोन हिरव्या मिरच्या, चार लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, साखर. 

कृती : 

पालकाची पाने मिठाच्या पाण्यात काही वेळ बुडवून ठेवावी आणि नंतर दोन ते तीन वेळेस पाण्याने चांगली धुवून घ्यावी. त्यातले पाणी नितरवुन टाकावे.    

पाने कोरडी झाली कि इतर सर्व साहित्यासह पाने मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर वाटून घ्यावी. 

हि चटणी दिसायला हिरवीगार दिसते आणि चवीलाही खमंग लागते. 

अननसाची चटणी 

साहित्य : 

दोन वाट्या अननसाचे तुकडे, एक वाटी बारीक चिरलेला खजूर, मोहरी, मेथ्या, जिरे, बडीशेप प्रत्येकी अर्धा चमचा, दोन तीन सुक्या मिरच्या (तुकडे केलेल्या), थोडे आले लांबट तुकडे करून, एक वाटी साखर किंवा गुळ, एक चमचा तेल, अर्धा चमचा मीठ, एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा तिखट 

कृती : 

भांड्यात तेल तापवून मोहरी, मेथ्या, बडीशेप, जिरं, सुक्या मिरच्यांचे तुकडे फोडणीला घालावे, त्यावर अननसाचे तुकडे, खजूर, आले, साखर किंवा गुळ, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून एक चमचा पाणी घालावे आणि भांड कुकरमध्ये ठेवून प्रेशर आल्यावर पाच मिनिटं मंद आचेवर ठेवावे. नंतर गॅस बंद करावा. 

कुकर गार झाला कि चटणी चांगली वाटून घ्यावी. 

खास टिप्स:

काही जणांना वासामुळे अननस आवडत नाही. पण अश्या प्रकारे चटणी केल्यास त्यांनी हि अननस नक्की आवडेल. 

chatani recipes, marathi chutney recipe in hindi, chutney in marathi, dosa chutney recipe in marathi, indian chutney recipes, shengdana ki chatni