चॉकलेट आईसक्रिम Chocolate Ice cream
उन्हामुळे जीवाची लाहीलाही झाली कि सगळ्यांना थंड पदार्थांचे वेध लागतात आणि त्या लिस्ट मध्ये आईस्क्रिम तर असणारच.
चॉकोलेट आईसक्रिम म्हणजे तर बाळ गोपाळांचे अगदी आवडीचे. ते सोप्या पद्धतीने आपण घरी बनवू शकतो. त्याची रेसिपी पहा.

साहित्य:
१ लिटर दुध, १ वाटी साखर, ४ टीस्पून कोर्नफ्लोर, ४ टीस्पून कोको पावडर, २ टीस्पून जी.एम.एस पावडर, २ वाट्या क्रिम, वॅनिला इसेन्स
कृती:
१ कप दुधात कॉर्नफ्लोर घालून चांगले मिक्स करावे. त्याच्या गुठळ्या होऊ देऊ नये. त्यात जी.एम.एस पावडर घालून उरलेले दूध आणि साखर एकत्र गरम करावे.
सारखे ढवळत राहावे.
नंतर त्यात कॉर्नफ्लोर मिक्स केलेले दूध घालावे. आणि सारखे ढवळत राहावे नाही तर दूध खाली लागण्याची शक्यता असते.
दूध जरासे घट्ट होईल. याला ३-४ मिनिट लागू शकतात.
त्यानंतर त्यात कोको पावडर घालावी.चांगले मिक्स करावे आणि गॅस बंद करावा.
भांडे खाली उतरून ठेवावे.
मिश्रण गार झाले कि त्यात फ्रेश क्रिम मिक्स करून हलक्या हाताने फेटावे.
त्यानंतर सेट होण्यास फ्रिजरमध्ये ठेवावे.
हे चॉकलेट आईसक्रिम सर्व करतांना आवडीनुसार वर चॉकोलेट सॉस किंवा चोकॉचीप्स टाकून सर्व करावे. आणि गरम उन्हाळ्यात हे गारेगार आईस्क्रिम एन्जॉय करावं.
चॉकलेट आईसक्रिम, chocolate ice cream, chocolate ice cream recipe in marathi, boli marathi, summer recipes, easy ice cream recipes, in marathi,