दाण्याची आमटी
साहित्य :
दाण्याचा कूट पाऊण वाटी, चार वाटी पाणी, लिंबाएवढी चिंच, त्याला दिड ते दुप्पट प्रमाणात गूळ, पाव चमचा जिरे, एक चमचा तूप, एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ
कृती :
पाण्याचा कूट थोडे पाणी घालून मिक्सरवर एकजीव करून घ्यावा. चिंच पाव वाटी पाण्यात भिजत घालावी.
तुपात जिरे टाकून खमंग फोडणी करावी. त्यात चार वाटी पाण्यात वाटलेला कूट मिसळून तो घालावा. चिंच कोळून घालावी.
त्यात गुळ, तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. चांगली उकळी येऊ द्यावी.
पाच मिनिटे चांगले उकळल्यावर आमटीला चांगला घट्टपणा येईल. मग गॅस बंद करावा.
खास टिप्स :
* या आमटीत एखादा बटाटा फोडी करून घातल्यास आणखी चांगली चव येते.
* चिंच नसल्यास अर्धी वाटी आंबट ताक घालावे.
* आवडत असल्यास, आमटी तयार झाल्यावर वरून किसलेले ओले खोबरे भुरकावे.
दाण्याची आमटी , upwas recipe in marathi, danyachi aamti, boli marathi, shravan recipes in marathi, fasting recipes, upwas easy recipes, shravan recipes marathi, danyachi aamti,