लसूण खोबऱ्याची चटणी 

लसूण खोबऱ्याची चटणी 

साहित्य  : 

दोन लसणीचे कांदे, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, अर्धा चमचा जिरे, सात- आठ काळे मिरे, चार –  पाच लाल सुक्या मिरच्या, एक चमचा मीठ, एक मोठा चमचा तूप 

कृती: 

लसूण सोलून घ्यावा. लाल मिरच्यांचे तुकडे करावे. तुपावर जिरे, मिरे आणि मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. खोबऱ्याचा किस मंद आचेवर भाजून घ्यावा. 

नंतर सर्व एकत्र करून मिक्सरवर जाडसर वाटून घ्यावे. हि चटणी फ्रिजमध्ये सहज ४-५ दिवसही टिकते.