लसूण चटणी 

लसूण चटणी 

वेगवेगळ्या चटण्या आणि लोणचे म्हणजे महाराष्ट्रीयन ताटाची शान. आपल्याकडे अनेक चटण्या केल्या जातात. लसूण चटणी सुद्धा अनेक घरात वेगवेगळ्या पद्दतीने केली जाते. 

खायला रुचकर, भाजीच्या जोडीला होते शिवाय लसूण खाण्याचे चांगले फायदे हि होतात. 

तर अश्याच लसणाच्या चटणीची सोपी आणि रुचकर रेसिपी इथे देत आहोत. नक्की करून बघा. 

lasun chatani recipe in marathi boli marathi
लसूण चटणी

साहित्य : 

अर्धी वाटी सोललेला लसूण, एक वाटी किसलेले सुके खोबरे, पाव वाटी भाजलेले दाणे, दिड चमचा तिखट किंवा ७- ८ सुक्या लाल मिरच्या, चिंचेचे मोठे बुटुक, चवीपुरता गुळ, पाव चमचा जिरे, दिड चमचा मीठ. 

कृती : 

सुके खोबरे थोडे भाजून घ्यावे. लाल मिरच्या वापरणार असल्यास चमचाभर तेलात त्या परतून घ्याव्या. नंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरवर अगर खलबत्त्यात चटणी कुटून घ्यावी. 

हे करतांना पाण्याचा हात अजिबात लागू देऊ नये. सर्व साहित्य आणि वापरायचे भांडे कोरडे असावे. यामुळे चटणी जास्त दिवस टिकते. 

खास टिप्स : 

* खोबरे नसल्यास तुम्ही आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्यांचा हि वापर करू शकतात. 

* वाढताना या चटणीवर कच्चे तेल टाकावे किंवा आवडीनुसार दही टाकावे. यामुळे चटणी आणखी खमंग लागते. 

या रेसिपीज हि नक्की वाचा:

रसाळ कुरकुरीत पनीर जिलबी 

मऊ गोड गुलाबजाम 

सोपा मँगो चीजकेक 

Scroll to Top