कटाची आमटी
कृती :
चार वाट्या हरबरा डाळीस चार वाटी पाणी घालावे. ती कुकरमध्ये दोन शिट्ट्या आणि मंद गॅसवर पाच मिनिटे अशी शिजवून घ्यावी. झाकण काढल्यावर डाळीतले सगळे पाणी काढून टाकावे.
या पाण्याला कट म्हणतात.
सुक्या खोबऱ्याचा तुकडा गॅसवर भाजावा. जाळ झाल्यावर खाली काढून घ्यावा. जाळ विझवून घ्यावा. त्यानंतर हळद, जिरे आणि हे भाजलेले खोबरे असे वाटण करून घ्यावे.
या वाटणाने आमटीला सुंदर रंग येतो.
२ लवंग, दालचिनीचा छोटा तुकडा, आणि वाटलेले वाटण कटात घालावे. या कटात चिंच, गुळ, तिखट, मीठ घालून लाल मिरच्या आणि कढीपत्ता यांची फोडणी घालावी.
खमंग कटाची आमटी तयार !
कटाची आमटी, katachi aamti, boli marathi, katachi aamti recipe in marathi,