माझे गाव झिम्मा २ lyrics

माझे गाव Jhimma 2 movie lyrics in marathi

झिम्मा १ च्या अभूतपूर्व यशानंतर आणि बरीच वाट पाहायला लावून झिम्मा २ हा चित्रपट आला. याने सुद्धा मराठी स्त्रियांच्या मनात एक खास अनुभूती निर्माण केली.

संसारातली रोजची कामे आणि व्याप बाजूला ठेवून स्वतःसाठी सुखाचे दोन निवांत क्षण काढता आले पाहिजे, त्यासाठी प्रवासाला निघणाऱ्या आणि त्यातून मैत्रीचा प्रवास करणाऱ्या स्त्रियांच्या कथा झिम्मा चित्रपटाच्या मध्यवर्ती होत्या.

झिम्मा २ मधले हे गाणे नक्कीच तुम्हाला हि गुणगुणायला आवडेल. त्यासाठी त्या गाण्याचे बोल lyrics इथे देत आहोत

वाऱ्यावर फिरे, मन हे उगाच
पाण्यावर दिसे, चेहरा तसाच,

शोधाया चालले, माझा ठाव
कुठल्या नभाच्या, पार आहे,
माझे गाव..
कुठल्या नभाच्या, पार आहे
माझे गाव.. माझे गाव..

जी गेली निसटून, हाती ये ती खूण
या ओठांवर हे, हासू पुन्हा कुठून,
एकांत हा बघ सांगतो, कानात ह्या
मलाच आज का, माझे नाव..

कुठल्या नभाच्या, पार आहे,
माझे गाव..
कुठल्या नभाच्या, पार आहे,
माझे गाव..
कुठल्या नभाच्या, पार आहे,
माझे गाव.

Scroll to Top