मुग डाळीचं धिरडं
साहित्य :
दोन वाट्या सालीची मुगाची डाळ, एक चमचा जिरेपूड, एक चमचा धणेपूड, एक चमचा तिखट, मीठ, एक मोठा कांदा बारीक चिरून, एक चमचा वाटलेला लसूण, अर्धा चमचा किसलेले आले, चिरलेली कोथिंबीर, आणि तेल
कृती :
सालीची मुगाची डाळ तीन ते चार तास धुवून भिजत घालावी.
नंतर मिक्सरमधून काढून त्यात चिरलेला कांदा, लसूण, धणेपूड, मीठ, तिखट, आलं आणि पाणी टाकून पीठ सरसरीत भिजवून घ्यावे.
आणि नेहमीप्रमाणे तापलेल्या तव्यावर तेल टाकून धिरडी करून घ्यावी.
moong dal chilla, moong daal dosa, moong dal, healthy weight loss, weight loss recipes, marathi recipes, easy recipes, recipes in marathi, how to make moong dal chilla at home easy,