आवळ्याचा मोरावळा | Immunity Booster Recipe

आवळ्याचा मोरावळा 

साहित्य : 

पाव किलो डोंगरी आवळे, अर्धा किलो साखर, एक वाटी पाणी आणि एक चमचा आले किसून 

कृती : 

आवळे चांगले वाफवून घ्यावे.  कोमट झाले कि बिया काढून त्याच्या  फोडी मोकळ्या कराव्या. 

पाणी आणि साखर एकत्र करून दोन तरी पाक करावा. 

त्यात आवळ्याच्या फोडी आणि आल्याचा किस घालावा. 

परत चांगले उकळावे. पाक हाताला चांगला चिकट लागेल असा मोरावळा दाट शिजवावा. आणि गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावा. 

मोरावळा पित्तशामक असतो. विशेषतः थंडीमध्ये मोरावळा खातात. या मध्ये आवडत नसल्यास आले नाही घातले तरी चालेल. 

आवळ्याचा मोरावळा, immunity recipe, indian gooseberry recipe, aavla muramba, aamla muramba, aamla, aavla recipes,