मटण दालचा 

मटण म्हणजे नॉन व्हेज खवय्यांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय. आणि रविवार सारखा सुट्टीचा खास दिवस म्हणजे तर विचारायलाच नको. पण मटणाच्या दर वेळेस कोणत्या वेगळ्या रेसिपीज करायच्या हा मोठा प्रश्न असतो ना ?

मग यावेळी हि खास मटण दालचा रेसिपी करून बघा. सोपी तर आहेच शिवाय अतिशय चविष्ट. 

mutton dalcha recipe in marathi

मटण दालचा 

साहित्य : 

पाव किलो मटण, पाऊण कप हरबरा डाळ, २ चमचे आले लसूण पेस्ट, दीड चमचा मिरपूड, दीड चमचा बडीशेप पूड, १ बारीक कांदा चिरून, २ कांदे पातळ चिरून, ४ चिरलेल्या मिरच्या, तेल , तूप, मीठ, कोथिंबीर

कृती : 

डाळ एक तास भिजवून ठेवावी. मग अर्धा चमचा हळद घालून मऊ शिजवून घ्यावी. आणि मग घोटून बाजूला ठेवावी. 

उभा पातळ चिरलेला कांदा तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा. त्यानंतर त्या तेलात आले लसूण पेस्ट, मिरच्या, हळद, लाल तिखट, धने पावडर, बडीशेप पावडर आणि मिरपूड घालून त्यावर मटण घालावे आणि चांगले परतून घ्यावे. 

तेल सुटायला लागले कि मीठ घालून २ कप पाणी घालून मऊ शिजवून घ्यावे. 

मटण चांगले शिजले कि त्यात घोटलेली डाळ, थोडे कोमट पाणी आणि कुरकुरीत तळलेला थोडा कांदा चुरून घालावा. मीठ घालावे. आणि एक उकळी आणावी. 

वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

Scroll to Top