केशरी पानगी 

केशरी पानगी (Paangi Recipe)

साहित्य : 

एक वाटी तांदुळाची पिठी, एक हापूस आंबा, दोन मोठे चमचे साखर, एक मोठा चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ, केळीची पाने आणि अर्धा कप दूध 

कृती : 

आंब्याचा रस काढून त्यात साखर घालावी. या आमरसात तांदुळाची पिठी घालून भज्याच्या पिठासारखी सैल कालवावी. 

गरज वाटली तरच दूध वापरावे. 

आता केळीच्या पानांचे लहान तुकडे करून त्यावर हे पीठ पसरून घ्यावे आणि वरून पानाचा दुसरा तुकडा ठेवून थोडे दाबून झाकावे. तापलेल्या तव्यावर हे पान ठेवावे. 

आधी पान भाजल्याचा चुर्रर्र आवाज येईल, काही वेळाने हा आवाज बंद झाला कि पानासह पानगी हलकेच उलटवावी. 

दुसऱ्या बाजूने हि जरा वेळ भाजून घ्यावे. 

चांगले शेकले गेले कि, हे पान ताटात काढून ठेवावे. हि केशरी पानगी दोन्ही बाजूची केळीची पाने काढून गरम गरम खाण्यास द्यावी. वरून साजूक तूप वाढावे. 

Scroll to Top