peruchi koshimbir, marathi recipes
पेरूची कोशिंबीर
साहित्य :
कमी बियांचे आणि मोठे दोन पेरू, पाव वाटी दही, एक मोठा चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, थोडी कोथिंबीर
कृती :
पेरू चिरून बारीक तुकडे करावे. बिया नको असल्यास चिरताना काढून टाकाव्या.
इतर साहित्य त्यात टाकून चांगले मिक्स करावे. आणि लगेच सर्व्ह करावी.
खास टिप्स:
* दही आधी टांगून ठेवल्यास त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. आणि अश्या दह्याचा वापर करून कोशिंबीर बनवल्यास कोशिंबीर जास्त वेळ चांगली राहते.
Very nice 👌👌👌