पांडुरंगाची आरती 2

पांडुरंगाची आरती 2

vitthal aarti in marathi bolimarathi.com

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ १ ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥