अननस पाक | Pineapple Recipe

अननस पाक

साहित्य : 

पिकलेल्या अननसाच्या साले काढून बारीक फोडी एक वाटी, दोन वाट्या साखर आणि एक वाटी पाणी 

कृती : 

एका पातेल्यात एक वाटी पाणी घालून अननसाच्या फोडी झाकण ठेवून शिजत ठेवाव्या. दोन मिनिटांनी फोड हाताला मऊ लागली कि फोडी बाजूला काढून ठेवाव्या. 

नंतर फोडी शिजवलेल्या पाण्यात साखर घालून साखरेचा दोन तारी पाक करावा. 

या पाकात शिजलेल्या फोडी घालून परत एकदा उकळावे आणि पाक गार करावा.

अननसाला मुळात थोडी आंबटसर चव असते म्हणून हा पाक करतांना वरून लिंबू पिळायची गरज नसते.  

ananas pak, pineapple recipes, अननस, pineapple recipe, yummy recipes in marathi, epic recipes, fruits recipes, marathi recipes, recipes in marathi, मराठी पदार्थ, मराठी पाककृती, अननस पाक, अननस रेसिपी, अननसाचे काय बनवावे, अननस जॅम