गार्लिक चिकन | Garlic Chicken

गार्लिक चिकन Garlic Chicken

साहित्य : 

१ किलो चिकन, २ मोठ्या जुड्या हिरव्या पातीचा लसूण, ८-१० लसणाच्या पाकळ्या, २ वाट्या पातळ उभा कापलेला कांदा, ८-१० लाल मिरच्या, ५-६ हिरव्या मिरच्या, आले, २ चमचे गरम मसाला, पाव वाटी बटर, १ चमचा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ 

कृती : 

हिरवा लसूण पात, आले, हिरव्या मिरच्या आणि गरम मसाला एकत्र करून वाटावे. लसणाच्या पाकळ्या उभ्या कापाव्या. 

एका पॅनमध्ये बटर तापवावे. त्यावर लसूण चांगला परतून घ्यावा आणि त्यावर चिकनचे पिसेस घालून चिकन लसूणसोबत चांगले परतावे. 

पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून चिकन अर्धे शिजवावे. 

दुसऱ्या पॅनमध्ये तेल आणि बटर एकत्र तापवावे. 

त्यावर कांडा आणि बारीक चिरलेल्या लाल मिरच्या परताव्या. कांद्याचा रंग बदलला कि त्यात हिरवे वाटण घालावे आणि चांगले परतून घ्यावे. 

तेल सुटू लागले कि त्यात चिकन मसाल्यासह घालावे. 

मीठ घालून मिक्स करावे आणि चिकन पूर्ण शिजू द्यावे. 

गार्लिक चिकन सर्व करताना वरून बटर आणि लसणाचे काप घालून गरम सर्व्ह करावे. 

garlic chicken, garlic chicken recipe, garlic chicken dry, chicken recipes, marathi recipes, how to make garlic chicken, गार्लिक चिकन, चिकन, chicken starter recipe in marathi,