रचिल्या ऋषिमुनींनी Song Lyrics
रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत || धृ ।।
वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत ।। १ ।।
येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत ।। २ ।।
मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत ।। ३ ।।