साबुदाणा खिचडी | Sabudana khichdi recipe for fasting in marathi

उपवासाचे पदार्थ : साबुदाणा खिचडी 

साहित्य : 

तीन वाट्या साबुदाणा, दोन वाट्या भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाच ते सहा हिरव्या मिरच्या, पाऊण चमचा मीठ, पाऊण चमचा साखर, तीन चमचे तूप किंवा तेल, अर्धा चमचा जिरे 

कृती : 

खिचडी करण्याआधी सुमारे चार ते पाच तास साबुदाणा चार चमचे पाणी ठेवून भिजवावा. खिचडी करायला घेताना साबुदाणा हाताने ताटात मोकळा करून घ्यावा.

कढईत तूप किंवा तेल, जिरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी. साबुदाणा टाकून हलवून घ्यावा.

नंतर लगेच त्यात दाण्याचे कूट, साखर, चवीनुसार मीठ घालून खिचडी चांगली मिक्स करून घ्यावी.

मंद गॅसवर कढईवर झाकण ठेवून ५-१० मिनिटे ठेवावी . मधून मधून हलवत राहावी. म्हणजे खिचडी खाली लागत नाही.

चांगल्या दोन वाफा आल्या कि गॅस बंद करावा. साबुदाणा खिचडी (sabudana khichdi for fasting) खायला देताना लिंबाची फोड, चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे वरून टाकून द्यावी. 

खास टिप्स : 

* साबुदाणा भिजवण्याआधी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यावा. मग पुन्हा पाणी टाकून भिजवावा. यामुळे काही कचरा असल्यास निघून जातो. 

* साबुदाणा खिचडी करतांना हलकासा दुधाचा शिपका मारून एक वाफ आणावी. खिचडी एकदम हलकी आणि लुसलुशीत होते. 

* वेळ असल्यास साबुदाणा रात्री भिजवून ठेवावा. साबुदाणा बुडेल एवढे पाणी टाकून एक ते दोन तास भिजवावा. आणि नंतर पाणी काढून टाकावे. रात्रीतून साबुदाणा अंगच्या पाण्यात मस्त फुलून येतो. 

sabudana khichdi, sabudana khichdi recipe, sabudana khichdi recipe in marathi, fast recipes, vrat recipes, vrat recipes for dinner,

साबुदाणा कशापासून तयार होतो?

साबुदाणा छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर साबुदाण्याची खीर आणि खिचडी बनवण्यासाठी करतात.