दिवाळीची साफसफाई सोपी करा या खास टिप्सने | Tips for Diwali Cleaning

दिवाळीचे नाव ऐकताच जशी फराळाचे पदार्थ आणि फटाके आठवतात, त्याचप्रमाणे गृहिणींना दिवाळीची स्वच्छता आठवते. रोज थोडीफार साफसफाई केली जात असली तरी दिवाळीची स्वच्छता विशेष असते. यावेळी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो.

हिंदू संस्कृतीत दिवाळीचे वेगळे महत्त्व आहे. आणि त्यातच स्वच्छतेचे महत्त्व आहे. असे मानले जाते की दिवाळीत जे घर स्वच्छ असते, तेथे पवित्रता राहते आणि देवी लक्ष्मीला अशी घरे आवडतात. या कारणास्तव, स्वच्छ घरांवर धन आणि समृद्धीचा पाऊस पडतो. आणि त्याच वेळी घर स्वच्छ असेल तर घरातील सर्वांचे आरोग्यही चांगले राहील. त्यामुळेच दिवाळीत घराच्या स्वच्छतेला वेगळे महत्त्व आहे.

पण ही (diwali cleaning) साफसफाई सोपी नाही. घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे हे अवघड काम आहे. आणि हे सर्व दिवाळीच्या इतर कामांसोबतच केले जाते.
दिवाळीसाठी घराची साफसफाई हि अवघड गोष्ट सोपी केली जाऊ शकते का?

नक्कीच. म्हणून तर काही खास टिप्स आज आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामुळे दिवाळीसाठी घराची सफाई करणे सोपे होईल. (tip for diwali house cleaning)

दिवाळीची साफसफाई सोपी करा या खास टिप्सने 

प्लँनिंग / नियोजन करणे सगळ्यात महत्वाचे

दिवाळीची स्वच्छता जितक्या लवकर सुरू होईल तितके चांगले. पण त्याचबरोबर नियोजनही आवश्यक आहे. नियोजन न करता कोणतेही काम केल्यास अपेक्षित परिणाम मिळण्यात अडचण येऊ शकते.
त्यासाठी आधी काय करायचे, साफसफाईसाठी कोणत्या वस्तूंची गरज आहे, किती वेळ लागू शकतो याचे नियोजन केले पाहिजे. तुमच्या घरातील खोल्यांच्या संख्येनुसार तुम्ही नियोजन करू शकता.

नियोजनामुळे काम थोडे सोपे होईल आणि काही काम बाकी आहे, असे होणार नाही.

घरातील सदस्यांची मदत घ्या

अनेक घरांमध्ये फक्त महिलाच साफसफाईच्या कामात व्यस्त दिसतात. पण ही गोष्ट आता बदलायला हवी. घराच्या स्वच्छतेच्या कामात तुम्ही घरातील सदस्यांनाही सहभागी करून घ्या. फक्त त्यांना ओरडून हे काम करायला लावू नका हे लक्षात ठेवा. त्यापेक्षा त्यांना समजावून थोडे गोड बोलून साफसफाईचे काम द्या. यामुळे त्यांना हे काम जबरदस्तीचे असे वाटणार नाही.

मुलांना त्यांची खोली, खेळणी स्वच्छ आणि व्यवस्थित करण्यासाठी प्रोत्साहन द्या. या कामात त्यांना थोडी मदत करा, पण त्यांना जास्त काम करू द्या. असे केल्याने मुलांना लहानपणापासूनच मेहनतीचे महत्त्व कळेल. विखुरलेली खेळणी गोळा करण्यासाठी किती मेहनत आणि वेळ लागतो हे पाहिल्यावर त्यांना वस्तू त्यांच्या जागी ठेवण्याची सवय होईल.

स्वच्छता करून देणाऱ्या खाजगी एजन्सीजचा लाभ घ्या 

दर दिवाळीसाठी घरातली गृहिणीचा स्वछता आणि दिवाळीचा फराळ करून दमत असते. एखाद्या वर्षी तिला आराम देण्यासाठी  स्वच्छता करून देणाऱ्या खाजगी एजन्सीजचा लाभ घेऊ शकता.  

त्याचा फायदा म्हणजे त्यांच्याकडे स्वच्छतेच्या आधुनिक पद्धती आणि उपकरणे असतात. जे वस्तूंना हानी न पोहोचवता चांगले साफ करू शकतात. सोफ्यापासून बाथरूमपर्यंत सर्व काही आपण स्वतः केले तर जास्त वेळ लागेल आणि आपण एकट्या हाताने अगदी खोलवर साफ करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही या प्रकारच्या एजन्सीच्या सेवा एकदा वापरून पाहू शकता.

जुन्या, नको असलेल्या, खराब झालेल्या गोष्टी काढून टाका

जुने सामान म्हणजे जे गेल्या ६ महिन्यात वापरले गेले नाही किंवा त्याहून जुने काही सामान असेल तर नक्कीच त्या वस्तू काढून टाका. एखादी गोष्ट कधीतरी लागेल या विचाराने आपण ती गोष्ट ठेवतो. पण हे करत असताना कपाट कधी अशा गोष्टींनी भरून जाते, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग नव्या गोष्टी आणल्या कि त्यांना जागाच नसते. म्हणून आधी जुन्या, नको असलेल्या, खराब झालेल्या गोष्टी काढून टाका.

काही खाल्ल्याशिवाय साफसफाईला सुरुवात करायची नाहीच

न खाता साफसफाई सुरू केली तर लवकर थकवा येतो आणि त्याचवेळी चिडचिडही वाढते. थोडा हेवी नाश्ता करून जर तुम्ही साफसफाई करायला सुरुवात केली तर तुम्ही खूप काम चांगल्या आणि उत्साहाने करू शकता. आणि जर हेवी नाश्ता असेल तर साफसफाई केल्यानंतर पुन्हा स्वयंपाकाचे टेन्शन येणार नाही. काही हलकेफुलके हि करू शकता. यामुळे तुम्हाला विश्रांतीसाठी ही वेळ मिळेल.

विकली क्लिनिंग रुटीन बनवा 

दिवाळीनंतर तुम्ही विकली क्लिनिंग रुटीन बनवले पाहिजे. ज्यामध्ये दररोज प्रत्येक खोलीची थोडी साफसफाई करता येते. असे केल्याने वस्तू स्वच्छ राहतील आणि दिवाळीत वर्षातून एकदा स्वच्छता केली तर काम फारसे पडणार नाही. या रुटीनला दररोज 5 ते 10 मिनिटे देऊन, गोष्टी सहजपणे स्वच्छ आणि व्यवस्थित केल्या जाऊ शकतात. यामुळे घर नेहमी स्वच्छ दिसते आणि साफसफाईचा कोणताही थकवा आणि टेन्शन येत नाही.

आशा आहे की तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील. तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना पण शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकता. आपल्याला योग्य माहिती दिल्यास आम्हाला आनंद होईल.