शिंगाड्याच्या पिठाचा शिरा 

शिंगाड्याच्या पिठाचा शिरा 

साहित्य :

शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पाव ते अर्धा वाटी तूप, एक वाटी दाण्याचे कूट, एक वाटी साखर आणि दोन वेलदोड्यांची पूड 

कृती : 

तुपावर शिंगाड्याचे पीठ चांगले खमंग लालसर होईस्तोवर परतून घ्यावे. त्यात एक वाटी पाणी घालून पीठ चांगले शिजवून घ्यावे. 

नंतर त्यात दाण्याचे कूट, साखर, वेलदोडा पूड टाकावी. 

चांगले मिक्स करावे. मंद गॅसवर साखर विरघळू द्यावी. साखर विरघळली कि गॅस बंद करावा आणि गरम गरम शिरा खाण्यास द्यावा. 

Scroll to Top