रताळ्याचा किस
साहीत्य :
पाव किलो रताळे, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, दोन मोठे चमचे तेल किंवा तूप, पाच सहा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तीन चमचे नारळाचा किस, दोन चमचे जिरे
कृती :
सर्वप्रथम रताळे स्वच्छ धुवावेत. नंतर ते किसून घ्यावेत.
कढईत तेल किंवा तूप गरम करावे. त्यात जिऱ्याची फोडणी द्यावी.
जिरे तडतडले कि मिरची आणि किसलेले रताळे टाकावे, त्यातील पाणी आटेपर्यंत मंद आचेवर परतत राहावे.
नंतर त्यात मीठ, शेंगदाण्याचा कूट, नारळाचा चव टाकावा.
पुन्हा एकदा मिश्रण लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यावे. गरमगरमच खाण्यास द्यावे.