घरच्याघरी जिलेबी कशी बनवाल | Jalebi Recipe In Marathi

जिलेबी

 साहित्य : (Jalebi Recipe Ingredients)


मैदा २ वाटी, तळण्यासाठी तेल, साखर २ वाटी, बेकिंग सोडा अर्धा चमचा, बेकिंग पावडर २ चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा, दही २ चमचे, दूध १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, केसर अर्धा चमचा, पाणी 

कृती : (how to make jalebi)

एका भांड्यात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दही आणि पाणी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे मिसळुन घ्या. 

मिश्रणाला चांगले फेटुन घ्या. सर्व मिश्रण मुलायम होईपर्यंत फेटुन घ्या.

एका दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी मिक्स करा. गॅसवर त्याचा पाक तयार करण्यासाठी ठेवा. त्यात १ चमचा दूध आणि लिंबाचा रस टाका. फाटलेले दूध वरच्यावर काढून घ्या. 

त्यात केसर आणि वेलची पावडर टाका. चांगले गरम करा. सर्व पाक चिकट झाला आहे की नाही हे एकदा चेक करा.

आता कढईत तेल गरम करा. एका प्लास्टिकच्या पिशवीत फेटलेले घट्ट मिश्रण घ्या. एका टोकाच्या बाजूने छेद करा. आता गोलाकार आकाराच्या जिलेब्या तेलात सोडा.हलका सोनेरी रंग येईपर्यंत जिलेबीला तळा.

जिलेबी तळून झाल्यावर लगेच साखरेच्या पाकात ठेवून द्या. म्हणजे पाक चांगला जिलेबीमध्ये शोषला जाईल.

 हा पदार्थ तुम्ही गरम किंवा थंड अशा दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता.