मसाल्याचे वऱ्याचे तांदूळ
साहित्य :
दोन वाट्या वऱ्याचे तांदूळ, एक बटाटा, अर्धी वाटी अर्धवट कुटलेले शेंगदाणे, पाच सहा मिरच्या, पाव चमचा जिरे, मीठ आणि दोन चमचे तूप
कृती :
बटाटयाच्या बारीक फोडी करून पाण्यात टाकाव्यात. वऱ्याचे तांदूळ दोन तीनदा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
तुपाची जिरे घालून फोडणी करावी.
त्यात धुतलेले वऱ्याचे तांदूळ घालून चांगले परतून घ्यावे. त्यातच बटाटा फोडी, दाण्याचे कूट, मिरच्यांचे तुकडे घालावे. चार वाटी आधणाचे पाणी त्यात घालावे.
चवीनुसार मीठ घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.
प्रथम दोन मिनिटे मध्यम आचेवर ठेवून नंतर गॅस मंद करावा.
शिजल्यावर गॅस बंद करून वऱ्याचे तांदूळ चांगले वाफेवर उमलू द्यावे.
खायला देतांना वरून साजूक तूप घालून द्यावे.
मसाल्याचे वऱ्याचे तांदूळ, upwas recipes, upwas recipes in marathi, boli marathi, marathi recipes, varyache tandul, bhagar aamti recipe, bhagar aamti, upwas easy recipes,