दळीचे लाडू  | Wheat Laddu Recipe

दळीचे लाडू  

साहित्य : 

तीन वाट्या गव्हाचे जाडसर  दळलेले पीठ, वेलची पूड आणि बदाम काप, दिड वाटी पिठीसाखर, एक चमचा साजूक तूप 

कृती : 

आधी गव्हाचं पीठ कोरडंच भाजून घ्या. फार खरपूस न भाजता हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्या. 

एका मोठ्या परातीत आधी तूप फेसून घ्या. तूप चांगले फेसले गेले कि ते हलकं होतं आणि पांढरंशुभ्र दिसत. 

आता यात पिठीसाखर, वेलची पूड, बदाम काप आणि भाजलेली कणिक घाला आणि हे सगळं मिश्रण हलकं होईपर्यंत परातीतच वाटीने चांगले रगडून घ्या. 

१०-१५ मिनिटं हे मिश्रण चांगलं रगडल्यावर हे चांगले एकजीव होते मग याचे लाडू वळून घ्यावे. 

प्रत्येक लाडूवर एक काजूचा तुकडा किंवा मनुका सजावटीसाठी लावाव्या. 

खास टिप्स : 

या लाडूंसाठी कणिक नेहमीच्या पिठापेक्षा जाड आणि रव्यापेक्षा बारीक अशी दळून घ्यावी. कणिक कोंड्यासहीत वापरावी. 

wheat laddu recipe, kankeche laadu, laadu recipe, healthy snacks, indian snacks , wheat laddu recipewheat flour laddu recipe jaggery wheat flour ladoo with sugar, laddu atta ladoo recipe