उपवासाचे आप्पे
साहीत्य :
दोन वाटी साबुदाणा, दीड वाटी वरई तांदूळ, चिमूटभर इनो, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी दही, दोन टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ
कृती :
साबुदाणा आणि वरई दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्या. नंतर त्यात दही व पाणी टाकून एकत्र भिजवा.
हे मिश्रण २ तास झाकुन ठेवा. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घाला. चांगले फेटून घ्या.
अप्पे पात्राला तेल लावून त्यामध्ये एक मिश्रण घाला. एक मिनिटानंतर परतून घ्या.
उपवासाचे आप्पे तयार. उपवासाचे आप्पे दह्यासोबत छान लागतात.