तुझ्या कांतीसम रक्तपताका lyrics

तुझ्या कांतीसम रक्तपताका lyrics

सगळ्या शुभ कार्यांच्या सुरुवातीला आपल्याकडे श्री गणेशाची आराधना करतात. आणि त्याच पार्श्वभूमीवर रोजची सकाळ जो सुंदर आनंद, उत्साह आपल्या जीवनात आणते त्यासाठी श्री गणेशाचे स्मरण आपण करतो. 

हे प्रभातगीत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि याचे बोल, स्वर, संगीत सगळंच आपल्याला मंत्रमुग्ध करतात. याच गीताचे बोल इथे देत आहोत. 

गीत:  ग दि माडगुळकर                                             संगीत: स्नेहल भाटकर
गायिका: सुमन कल्याणपूर                                          चित्रपट: अन्नपूर्णा

tujhya kantisam rakta pataka lyrics in marathi boli marathi
तुझ्या कांतीसम रक्तपताका lyrics

तुझ्या कांतीसम रक्तपताका पुर्वदिशि फडकती
अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती

सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
शुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडुनी वीणा जगविते सरस्वती भगवती

आवडती तुज म्हणून आणिली रक्तवर्ण कमळे
पाचूमण्यांच्या किरणासम ही हिरवी दुर्वादळे
उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती

शूर्पकर्णका, उठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तूच नियंता विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर ब्रह्मा श्रीपती

आपली गाणी:

प्रभाती सूर नभी रंगती 

Scroll to Top