कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा Konas thauk kasa pan siemat gela sasa
आपला ससा पण भारी अवखळ हो. कुठे कुठे जातो आणि काय काय गमती जमती करतो, हे सगळे या बालगीतात मांडले आहे. राजा मंगळवेढेकर यांनी या ससुल्याच्या छान छान गमती जमतींचे वर्णन या गीतात केले आहे. शमा खळे यांचा स्वर या बाल गीताला आणखी श्रवणीय करतो.
konas thauk kasa pan sinemat gela sasa marathi baalgeet lyrics in marathi
कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान
सा नी ध प म ग रे सा रे ग मा प
दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा !
ससा म्हणाला, चहा हवा
कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, छान छान !
ससा म्हणाला, काढ पान
कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे
बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ
आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, शाबास !
ससा म्हणाला, करा पास