बारीक चुरमुऱ्याचा चिवडा | Churmure chivda

बारीक चुरमुऱ्याचा चिवडा

बारीक चुरमुऱ्याचा चिवडा, churmure chivda recipe in marathi, murmure chivda, diwali faral recipe, duparcha velcha khau, afternoon snack ideas, marathi recipes,

साहित्य : 

कुरकुरीत बारीक चुरमुरे अर्धा किलो, पाव ते अर्धा वाटी तेल, मोहरी, हिंग, अर्धा चमचा हळद, पाच ते सहा मिरच्या, मीठ आणि साखर दोन चमचे किंवा चवीनुसार, लसणाच्या १०-१२ पाकळ्या, पाऊण वाटी शेंगदाणे. पाव वाटी फुटाण्याची डाळ / पंढरपुरी डाळे, कढीपत्ता 

कृती : 

चांगले कुरकुरीत चुरमुरे घ्यावे. तेल तापत ठेवून त्यात मोहरी आणि हिंग घालावे. शेंगदाणे टाकून ते गुलाबीसर होईपर्यंत परतावे. 

मग सोललेल्या लसणाचे तुकडे, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता आणि डाळे / फुटाण्याची डाळ टाकावी. 

मिरची लसूण लालसर झाल्यावर हळद घालून खाली उतरवावे. 

चुरमुरे, मीठ आणि बारीक करून साखर/ पिठीसाखर त्यात घालून हलक्या हाताने चांगले मिक्स करावे.

गार झाले कि हवाबंद डब्ब्यात हा चिवडा भरून ठेवावा. 

खास टिप्स : 

* हा चिवडा दिवाळीला हि बदल म्हणून करता येतो किंवा इतर वेळेस मुलांना दुपारच्या भुकेचा खाऊ म्हणून हि करून ठेवल्यास उपयोगी होतो. 

वेळेवर मुलांना यात कांदा, टमाटर, कोथिंबीर टाकून एक चांगली पौष्टिक भेळ हि बनवून देता येते.