चांदोबा चांदोबा भागलास का | Chandoba Bhaglas Ka Lyrics

चांदोबा चांदोबा भागलास का?

ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेले हे बालगीत प्रत्येकाच्या विशेष आवडीचे. 

आभाळात दिसणारा चांदोमामा अचानक ढगाआड का गेला? तो रुसला आहे का? कोणावर बरे रुसला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या बालगीतात आहे. 

चांदोबा चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !

आई-बाबांवर रुसलास का?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतुनी जाशील का?
दूध न्‌ शेवया खाशील का?

आई बिचारी रडत बसेल
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का?
बाबांची बोलणी खाशील का?

चांदोबा, चांदोबा कुठे रे गेलास?
दिसता दिसता गडप झालास !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का?
पुन्हा कधी आम्हांला दिसशील का?

Chandoba Chandoba Bhaglas Ka lyrics in Marathi, marathi baalgeet, lyrics, marathi baal geet,