भाजक्या पोह्यांचा चिवडा | Bhajke pohe chivda

भाजक्या पोह्यांचा चिवडा

भाजक्या पोह्यांचा चिवडा, bhajke pohe chivda, bhajke pohe chivda kasa banvava, diwali recipe in marathi, chivda recipe, marathi recipes, marathi recipe,

साहित्य : 

अर्धा किलो भाजके पोहे, १ वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी  फुटाण्याची डाळ, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, १ वाटी तेल, पाव चमचा हिंग, अर्धा ते पाऊण चमचा हळद, २ चमचे तिखट, एक ते दिड चमचा मीठ, २ चमचे साखर, कढीपत्ता आणि थोडी आमचूर पावडर 

कृती : 

प्रथम वाटीभर तेल तापत ठेवावे. त्यात शेंगदाणे तळून काढून ठेवावे.

नंतर तेलात मोहरी टाकावी. ती तडतडल्यावर त्यात  फुटाण्याची डाळ, खोबऱ्याचे काप,कढीपत्ता आणि हिंग टाकावे.

हळद टाकून गॅस बंद करावा. मग त्यात पोहे, शेंगदाणे, तिखट,मीठ आणि साखर घालून सर्व हलक्या हाताने चांगले कालवून घ्यावे. 

चिवडा कोरडा वाटल्यास पुन्हा पाव ते अर्धी वाटी तेलाची थोडी मोहरी आणि हळद घालून फोडणी करून घालावी. 

खास टिप्स : 

* या चिवड्याला पातळ पोह्यांच्या चिवड्यापेक्षा जास्त तेल लागते. 

* या चिवड्यासाठी पोहे एक दिवस उन्हात ठेवल्यास चिवडा आणखी खमंग होतो. 

Scroll to Top