तळलेल्या पोह्यांचा चिवडा | Talalelya pohyancha chivda

तळलेल्या पोह्यांचा चिवडा 

तळलेल्या पोह्यांचा चिवडा fried poha chiva, diwali faral recipe in marathi, chivda recipe, chivda recipe in marathi

साहित्य : 

मध्यम आकाराचे अर्धा किलो पोहे, १ वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी फुटाण्याची डाळ, पाव वाटी खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी कढीपत्ता, १ चमचा हळद, पाव वाटी तिखट, ४ चमचे मीठ, पाव चमचा साखर, अर्धी वाटी जिऱ्याची पूड, अर्धी वाटी धण्याची पूड, २ चमचे तीळ, १ चमचा हिंग आणि तेल 

कृती : 

प्रथम कढईमध्ये तेल तापवून शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, फुटाण्याची डाळ आणि कढीपत्ता वेगवेगळे टाळून घ्यावे.

पोहे हि तळून त्यातील तेल चांगले निथळून घेणे. नंतर पोहे एका परातीत घ्यावे. 

एकीकडे फोडणी करण्यासाठी एका लहान कढईमध्ये तेल तापवून त्यात हिंग, जिऱ्याची पूड, धण्याची पूड आणि कढीपत्ता टाकणे. 

हि फोडणी किंचित गार करून तळलेल्या पोह्यांवर टाकणे. आता त्यात हळद, साखर, मीठ, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप आणि फुटाण्याची डाळ टाकणे.

हे सगळे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेणे. सगळे मिश्रण गार झाल्यावर हा चिवडा हवाबंद डब्ब्यात भरून ठेवणे. हा चिवडा बरेच दिवस टिकतो. 

खास टिप्स : 

*  या चिवड्यासाठी पोहे तळून घेण्याआधी त्यांना एक दिवस उन्हात ठेवल्यास पोहे तेल कमी पितात आणि चिवडा आणखी खमंग होतो. 

* आवडत असल्यास या चिवड्यामध्ये मक्याचे पोहे हि तळून घालता येतील. चिवडा आणखी छान लागतो.