पोहे
Pohe recipe in marathi
साहित्य :
तीन वाट्या मध्यम जाड पोहे, दोन कांदे, सहा सात हिरव्या मिरच्या, पाव वाटी कच्चे शेंगदाणे, एक चमचा मीठ, पाव वाटी तेल, फोडणीसाठी मोहरी, हळद,थोडा हिंग, कोथिंबीर, मीठ चवीनुसार
कृती :
पोहे करण्याआधी १० मिनिट पोहे चाळणीत भिजवून निथळत ठेवावे.
फोडणीसाठी तेल गरम त्यात आधी कच्चे शेंगदाणे चांगले टाकून बाजूला काढावे.
त्यानंतर त्या कढईमध्ये मोहरी,हिंग, बारीक चिरलेला कांदा, मिरच्यांचे तुकडे टाकून फोडणी करावी.
चांगले परतून त्यात हळद टाकावी. मिक्स करावे. आता भिजवलेले पोहे, चवीनुसार मीठ आणि तळलेले शेंगदाणे टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.
कढई थोडा वेळ झाकून दोन तीन चांगल्या वाफा येऊ द्याव्या.
पोहे खायला देतांना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुके/ ओले खोबरे किसून भुरकुन द्यावे. सोबत एक लिंबाची फोड द्यावी.
pohe recipe in marathi, poha recipe, maharashtrian poha, maharashtrian breakfast, marathi breakfast recipe, breakfast recipe in marathi, marathi breakfast, poha easy recipe,