सुक्या खोबऱ्याच्या करंज्या | Karanji recipe

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या 

सुक्या खोबऱ्याच्या करंज्या, diwali faral in marathi, karanji kashi banvavi,  

साहित्य : 

दोन वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस, पाव वाटी खसखस, एक वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड 

सारणाची कृती :

सुक्या खोबऱ्याचा किस भाजून घ्यावा. खसखस भाजून कुटून घ्यावी. नंतर सुक्या खोबऱ्याचा किस, खसखस, वेलदोडा पूड आणि पिठीसाखर सर्व एकत्र करून सारण तयार करून ठेवावे. 

कव्हरसाठी साहित्य : 

बारीक रवा आणि मैदा प्रत्येकी एक वाटी, तळण्यासाठी तूप 

कृती : 

रवा, मैदा, चार चमचे कडकडीत तुपाचे मोहन आणि चवीपुरते मीठ घालून निम्मे दूध, निम्मे पाणी अश्या मिश्रणात घट्ट भिजवावे.

याकरता साधारण दूध आणि पाणी मिळून एक वाटी लागेल. हे पीठ भिजवून झाकून ठेवावे. तासाभराने हे पीठ चांगले कुटून घ्यावे. 

त्याच्या सुपारीएवढ्या गोळ्या कराव्या.  एक एक गोळी पुरीप्रमाणे पातळ लाटावी. त्यात साधारण एक ते दिड चमचा सारण बसेल. 

ते घालून दोन्ही बाजू मिळून पोळपाटावर कडेने घट्ट दाबावे. आणि कडेने कातण्याने कापावे. किंवा काटेचमचाने दाबून करंजीचे काटे काढावे.

या करंज्या तुपात खमंग तळून घ्याव्या.