ड्राय चिकन लॉलीपॉप 

ड्राय चिकन लॉलीपॉप 

साहित्य : 

१२ लॉलीपॉप पिसेस, २ अंडी, अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, प्रत्येकी चार चमचे शेजवान, टोमॅटो, चिली सॉस, चार चमचे आले लसूण बारीक चिरून,  अर्धी वाटी पातीचा कांदा आणि पात चिरून, मीठ, मिरपूड 

कृती : 

लॉलीपॉप पिसेस बाजारात रेडिमेड मिळतात. ते आणून चांगले स्वच्छ करून घ्यावे. साहित्यात दिलेले सर्व सॉस एकत्र करावे आणि ते लॉलीपॉपच्या पिसेसला चांगले लावून ६ – ७ तास मॅरीनेट करून घ्यावे. 

नंतर लॉलीपॉपचे पिसेस बाजूला काढून ठेवावे आणि त्या उरलेल्या मसाल्यात अंडी फोडून घालावी. चांगले फेटून मग त्यात कॉर्नफ्लोर घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण घट्टसर तयार करावे.

एका कढईत तळण्यासाठी तेल तापवत ठेवावे. लॉलीपॉपचे पिसेस केलेल्या बॅटर मध्ये बुडवून चांगले तळून घ्यावे. गॅस फार मोठा ठेवू नये. नाही तर पिसेस जळू शकतात. 

एक दुसऱ्या कढईमध्ये सर्व सॉस एकत्र करून त्यात चिरलेली पात आणि चिरलेला पातीचा कांदा घालावा. आणि वरून तळलेले लॉलीपॉपचे पिसेस टाकून नीट मिक्स करावे. म्हणजे प्रत्येक पीसला सॉस चांगला लागेल.

थोडे गरम करून वरून मिरपूड भुरकवावी आणि गरमा गरम सर्व्ह करावे.