मुगाच्या डाळीची खिचडी 

मुगाच्या डाळीची खिचडी 

साहित्य : 

तांदूळ दिड वाटी, मुगडाळ अर्धा ते पाऊण वाटी, अर्धा चमचा तिखट, मीठ चवीनुसार, मोहरी, हिंग, हळद, जिरे किंवा जिरेपूड, छोटे डाव तेल आणि कढीपत्ता 

कृती : 

प्रथम डाळ तांदूळ एकत्र करून धुवावे. पाच वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे.

तेल तापत ठेवून त्यात मोहरी, जिरे किंवा जिरेपूड, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. धुतलेले डाळ तांदूळ पाणी निथळून त्या फोडणीत परतून घ्यावे.

मग त्यात पाण्याचे आधण ओतावे. त्यात तिखट आणि चवीनुसार मीठ टाकावे.

मंद गॅस वर हि खिचडी शिजू द्यावी. याच पद्धतीने कुकर मध्ये हि खिचडी सहज करता येते. 

खास टिप्स : 

* मुगाच्या डाळीची खिचडी थोडी आणखी खमंग होण्यासाठी त्याची फोडणी करताना थोडा लसूण ठेचून घालावा. 

* आजारी व्यक्तीसाठी हि खिचडी बनवायची असल्यास तिखट न टाकता फोडणीत किंचित कच्चा मसाला टाकावा. याने जिभेला रुची येते.