चिकन टिक्का मसाला | Chicken Tikka Masala

चिकन टिक्का मसाला

साहित्य : 

बोनलेस चिकनचे मोठे काप, ५ चमचे आले आणि लसूण बारीक चिरून, २ अक्खे कांदे, २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी अक्खा गरम मसाला, २ वाट्या काजू क्रीम पेस्ट, ४ चमचे काश्मिरी तिखट, २ चमचे लाल तिखट, १ सिमला मिरची आणि १ कांदा चौकोनी कापून, बटर, तूप आणि टिक्का मसाला ४ चमचे आणि थोडे मीठ 

कृती : 

बोनलेस चिकनला मीठ लावून घ्यावे. आता त्या चिकनवर थोडा दाब ठेवून त्यातील सर्व पाणी निथळून घ्यावे. नंतर पिसेस चांगले कोरडे करावे. 

कांदा सोळावा आणि तेलाचा हात लावून गॅसवर भाजून घ्यावा. 

काश्मिरी लाल तिखटासोबत बारीक वाटावा. यात एक चमचा टिक्का मसाला घालावा. हा तयार झाला मुख्य बेस. या मसाल्याला मीठ लावून तो चिकनला चांगला चोळावा आणि ब्रशने तेल लावून गॅसवर भाजून घ्यावा. 

एका पॅनमध्ये तूप आणि बटर एकत्र तापवावे. त्यावर अख्खा गरम मसाला, आले लसूण पेस्ट, तिखट, मिरच्या, कांदे परतून घ्यावे. 

त्यात टोमॅटो सॉस आणि पेस्ट घालावी 

या मिश्रणात अर्धी वाटी पाणी घालावे आणि त्यात चिकनचे पिसेस, मीठ, लिंबाचा रस, बटर आणि टिक्का मसाला घालावा. घट्ट ग्रेव्ही झाल्यावर गॅस बंद करून गरम गरम चिकन टिक्का मसाला सर्व करावे.  

chicken tikka recipe, chicken tikka masala recipe, chicken tikka recipe in marathi, how to make chicken tikka masala, chicken tikka masala recipe in marathi, चिकन टिक्का मसाला, चिकन, chicken tikka masala indian recipe, chicken tikka masala powder,