तिळाचे कडक लाडू | Til Ladoo

तिळाचे कडक लाडू

साहित्य :

५00 ग्रॅम पांढरे तीळ, एक वाटी भाजलेले शेंगदाणे, एक वाटी किसलेले सुके खोबरे, एक टी. स्पू. वेलची पूड, एक टे. स्पू. तूप, ४00 ग्रॅम चिक्की-गूळ.

कृती :

तीळ खमंग भाजून घ्या. किसलेले खोबरं थोडे भाजून घ्या. शेंगदाणे सोलून घ्या, तीळ-शेंगदाणे-खोबरे एकत्र करा, कढईत तूप घालून चिक्कीचा गूळ एकत्र करून गॅसवर ठेवा. गूळ विरघळू द्या. पाकाला फेस आल्यावर वरील मिश्रण व वेलची पूड टाकून सतत ढवळा. गरम असतानाच भराभर लाडू वळवा. हे लाडू अतिशय खमंग व खुसखुशीत होतात. 

Tilache laadu, sankranti recipes, sankranti recipes in marathi,