तिळाच्या वड्या  | Sankranti Special

तिळाच्या वड्या  Tilachya vadya

साहित्य : 

भाजून बारीक केलेले तिळाचे कूट एक वाटी, जाडसर दाण्याचे कूट अर्धी वाटी, पाव वाटी खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेला गुळ वाटी भरून आणि एक चमचा वेलदोडा पूड 

कृती : 

तिळाचे कूट, दाण्याचे कूट, पाव वाटी खोबरे, वेलदोडा पूड एकत्र करून ठेवावी. 

गुळात एक चमचा तूप घालून गरम करण्यास ठेवावे. 

गुळ विरघळून पाक चिकट लागेस्तोवर गॅसवर ठेवावे. 

नंतर गॅस बंद करून त्यात सगळे मिश्रण ओतावे. नीट हलवावे. 

आता ताटाला तुपाचा हात लावून त्यावर लगेच मिश्रण ओतावे. 

मिश्रण गरम असतांनाच वरून उरलेला खोबरा किस भुरभुरावा.  आणि लगेच वड्या पाडाव्या. 

थंड झाल्यावर उलट्या करून ठेवाव्या म्हणजे लवकर गार होतात. 

नंतर पूर्ण कोरड्या झाल्यावर वड्या डब्ब्यात भराव्यात. 

खास टिप्स : 

या वड्या करतांना आधी एक वाटीच्या प्रमाणात करून पाहाव्या. म्हणजे कूट किती घालावे याचा नीट अंदाज येतो. 

til gul ladoo, til gul, til gul vadi recipe in marathi, sankranti recipes marathi, marathi til gul recipe, sankranti 2023, sankranti,